AdminMT - यांनी लिहिलेले | October 7, 2020

७ ऑक्टोबर २०२०
उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘एसआयटी’ला बुधवारी आपला रिपोर्ट दाखल करायचा होता. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश देत एसआयटीला तपासासाठी दिलेला कालावधी दहा दिवसांनी वाढवला आहे. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी एएनआयला याबाबत माहिती दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार एसआयटीला आपला रिपोर्ट सादर करण्यासाठी जो कालावधी देण्यात आला होता. तो आणखी दहा दिवसांनी वाढवला आहे.तीन सदस्यीय एसआयटीच्या पथकाने या प्रकरणातील पीडितेच्या गावात, ज्या शेतात तिच्यावर हल्ला झाला होता तिथे व जिथे तिला अग्नी देण्यात आला त्या जागेची पाहणी केली आहे. या वेळी एसआयटीच्या पथकाबरोबर फॉरेन्सिक तज्ज्ञ देखील होते. त्यांनी पीडित तरूणीवर हल्ला झाला त्या शेताची पाहणी केली. या पथकात उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे सचिव भगवान स्वरूप, डीजीपी चंद्रप्रकाश आणि पोलीस अधिकारी पूनम यांचा सहभाग होता.

पथकामधील सदस्यांकडून मंगळवारी सांगण्यात आले होत की, आमचा तपास उद्यापर्यंत पूर्ण होईल, आम्हाला आशा आहे की आम्ही राज्य सरकारला उद्यापर्यंत रिपोर्ट सादर करू. जर काही कारणास्तव तपास पूर्ण झाला नाही, तर आम्हाला एक-दोन दिवस वाढवून मिळू शकतात.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now