९ ऑक्टोबर २०२०,
सन २०२० चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) या संस्थेला देण्यात आले आहे. जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूएफपीच्या नावाची घोषणा नॉर्वेतील ऑस्लो येथील समिती केली आहे. १९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे. कोणीही उपाशी झोपू नये म्हणजेच झीरो हंगर या मोहिमेसाठी डब्ल्यूएफपी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत आहे.

यासंदर्भातील माहिती नोबेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. नॉर्वेमधील समितीने २०२० चा नोबेल शांतता पुरस्कार हा वर्ल्ड फूड प्रोग्रामला (डब्ल्यूएफपी) देण्याचा निर्णय घेतला आहे, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. “भूकेवरुद्ध डब्ल्यूएफपीने सुरु केलेल्या लढाईसाठी, तणाव आणि अशांतता असणाऱ्या प्रदेशांमध्ये शांततेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आणि भूक हे वाद आणि संघर्षाचे कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे,” असं नॉर्वेमधील समितीने पुरस्कार देताना स्पष्ट केलं आहे.

BREAKING NEWS:
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2020 Nobel Peace Prize to the World Food Programme (WFP).#NobelPrize #NobelPeacePrize pic.twitter.com/fjnKfXjE3E

— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2020

काय आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी)

वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) ही संस्था म्हणजे संयुक्त राष्ट्र संघांची उपसंस्था आहे. जगभरामधील भूकेसंदर्भातील समस्या आणि अन्नसुरक्षेच्या क्षेत्रामध्ये या संस्थेचे मागील जवळजवळ ६० वर्षांपासून अधिक काळ काम सुरु आहे. दर वर्षी डब्ल्यूएफपी ही संस्था ८३ देशांमधील ९१ लाख ४० हजार गरजू व्यक्तींना अन्य पदार्थ पुरवते. या संस्थेची स्थापना १९६३ साली झाली आहे. या संस्थेचे मुख्यालय इटलीमधील रोम शहरात आहे. या संस्थेच्या जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये शाखा आहेत.

VERO MODA Cotton a-line Dress

आमच्याशी संपर्क साधा
Call Now