१९ मार्च २०२०,
पिंपरी चिंचवड आणि पुण्यासाठी पुढचे १० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पिंपरी चिंचवड व पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. त्यातील केवळ पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११ एवढी आहे. देशातील कोणत्याही एका शहराची कोरोना बाधितांची संख्या पिंपरी चिंचवड एवढी नाही.

हे विषाणूंशी युद्ध आहे…war against virus, भोंगा वाजला आहे, युद्ध सुरू झालंय…आम्ही दिलेल्या सूचना तुम्ही पाळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. डॉक्टर, पोलीस, सरकारी अधिकारी चोवीस तास लढत आहेत, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही घरात राहून, गर्दी टाळून त्यांना सहकार्य करा, सरकारी सूचनांचे पालन करा, घराबाहेर पडू नका, सर्व धर्मियांनी सहकार्य करावे. मुख्यमंत्री आणि प्रशासन वारंवार सांगत आहेत कि घरी बसा घराबाहेर पडू नका,विशेष खबरदारी म्हणून शहरातील मॉल्स, शाळा, हॉटेल, बार, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद ठेवले आहेत. अनेक कर्मचारी हे work from home म्हणजे घरी बसून काम करत आहेत.

परंतु आज हि पिंपरी चिंचवड मधीलकाही लोक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत, रस्त्याच्या कडेवर बागेत बसलेले दिसत आहे, असेच एक दृश्य थरमॅक्स चौकातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या बागेत अराम करताना घोळका करून बसलेले दिसले. तर काल रात्री काळेवाडी चौकात रस्ता गर्दीने फुलून गेलेला दिसून आला. पिंपरी मार्केट हि बऱयापैकी चालू होते. परंतु आज पोलिसांनी आज ते जबरदस्तीने बंद करण्यास भाग पडले. चिखलीतील काही दुकानावर कारवाई करावी लागली. हे का होते आपण आपल्या जीवाशी का खेळत आहोत..?

आपण केंव्हा गंभीर होणार ..?

बाहेरच्या देशात जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला,अश्या देशात तिथले रस्ते ओसाड आणि निर्मनुष्य झालेले होते, लोक आपल्या घरात बसून होते. कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये एका दिवसात ४७५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. इटलीमधील मृतांचा एकूण आकडा ३ हजाराच्या आसपास पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्राण गमावले आहेत. युरोप आणि वेस्टर्न पॅसिफिक भागामध्येच (ज्यामध्ये आशिया खंडाचा खूप मोठा भाग येतो) कोरोनाचा संसर्ग झालेले ८० टक्के रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोना बाधितांची संख्या फेब्रुवारी मध्ये ३ वरून आतापर्यंत ८ हजारावर गेली आहे, तर इटली मध्ये ३ आठवड्यात ३१५०६ एवढी वाढली.

आपण काय करायला हवे- self isolation म्हणजे स्वतःला जगापासून अलिप्त ठेवणे म्हणजे – स्वयंपुरतं अलिप्तता,

कोरोना पासून बचाव करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, कारण जेंव्हा आपण घराबाहेर पडतो, तेंव्हा अनेक लोकांच्या संपर्कात येतो सार्वजनिक ठिकाणी फिरताना आपल्याला माहित नसते, कि कोणती व्यक्ती कोरोना बाधित आहे कि नाही हे समजणे अवघड असते, कोरोना बाधित झालेली प्रत्येक व्यक्ती लक्षणं दाखवेलच याची खात्री नाही त्यामुळे एखादी ठणठणीत दिसणारी व्यक्ती सुद्धा कोरोनाचे विषाणू वाहक असू शकते.
अशा माणसाने तुम्हाला स्पर्श केला किंवा तो शिंकला तर तुम्हाला हि कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो,जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीत कोरोनापासून वाचण्याचा सल्ला दिला त्यामध्ये हे स्पष्ट केले आहे कि नवा कोरोना व्हयरस पासून बचाव करण्यासाठी तुम्हांला सर्दी किंवा खोकला झालेल्या प्रत्येक व्यक्ती पासून कमीत कमी ३ फूट अंतर ठेवून राहिले पाहिजे आणि वारंवार हाथ स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. तसेच गर्दीत जाणे टाळावे. एकमेकांना भेटणं टाळलं पाहिजे कारण कोरोना व्हायरसचा फ़ैलाव Exponentially growth म्हणजे गुणकाराने वाढणारा रोग असा आहे, भारतात एका महिण्यापुर्वी केवळ तिनच कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण होते. आता हि संख्या १७७ वर गेली आहे हा आकडा हजारोवर जाऊ नये म्हणून बाहेर फिरू नका.

तुम्ही जर आता घरामध्ये नाही बसलात, तर कोरोना वारयासारखा शहरात पसरेल आणि शासनाला सर्व काही बंद करावे लागेल जसे चीन आणि इटली मध्ये सरकारला करावे लागले, तसेच नळकत आपणच आपल्या व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असू किंवा यात आपला सुद्धा जीव जाऊ शकतो. आपल्याला आपले शहर वाचवायचे असेल तर सरकारने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करा.कामाशिवाय घर बाहेर पडू नका. वारंवार हाथ स्वच्छ साबणाने धुवा. रस्त्यावर थुंकू नका, स्वतःची काळजी घ्या व आपल्या शहराला पण वाचवा.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now