News14 Pimpri Chinchwad - यांनी लिहिलेले | October 10, 2020

१० आॅक्टोबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.१० आॅक्टोबर रोजी ४६१ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ४४० तर शहराबाहेरील २१ रुग्णांचा समावेश आहे. आज शहराच्या हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८३४३३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७७७६६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १४१५जणांचा मृत्यू झालेला आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – चिंचवड (६२ वर्षे), नवी सांगवी (६५ वर्षे), पिंपरी (४६ वर्षे) ०२ स्त्री – चिंचवड (५५ वर्षे), पिंपळे गुरव (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – तळेगाव दाभाडे (६४ वर्षेयेथील रहिवासी आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे २३४५६१९ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये २७२७ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ५८४ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
 

आमच्याशी संपर्क साधा
Call Now