News14 Pimpri Chinchwad - यांनी लिहिलेले | October 11, 2020

११ आॅक्टोबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.११ आॅक्टोबर रोजी ३६४ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ३५२ तर शहराबाहेरील १२ रुग्णांचा समावेश आहे. आज शहराच्या हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८३७८५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७८१४९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १४३२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – पिंपळे सौदागर (६९ वर्ष), थेरगाव (६० वर्ष), काळेवाडी (६४ वर्ष), आकुर्डी (७९ वर्ष), नेहरुनगर (८० वर्ष),मोरवाडी (५१ वर्ष), रहाटणी (५० वर्ष), निगडी (७२ वर्ष, ४९ वर्ष), चिंचवड (८९ वर्ष) ५ स्त्री –  नेहरुनगर (६५ वर्ष), भोसरी (६६ वर्ष), आकुर्डी (७४ वर्ष), चिखली (४९ वर्ष), चिंचवड (६८ वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – रायगड (६१ वर्ष), कामशेत (४० वर्ष), अहमदनगर (५२ वर्ष), खेड (४८ वर्ष, ७२ वर्ष), आळंदी (५५ वर्ष), धनकवडी (५८ वर्ष), कात्रज (७१ वर्ष), फुरसुंगी (३० वर्ष), गोखले नगर (६५ वर्ष),   ३ स्त्री- देहुरोड (७१ वर्ष), देहुगाव (५५ वर्ष) शिरगाव (७० वर्ष),  रहिवासी आहे.

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now