१५ मे २०२०,
काल पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या अहवालामुळे पिपंरी चिचंवड मधील आकुर्डी , भाग काल मध्यरात्री बुध्दघोष सोसायटी जुनी सांगवी (न्यु युनीटी मेडिकेअर–जयराज रेसिडन्सी फेज १–गणेश बेकरी–वाघमारे रोड–हर्षल इलेक्ट्रीकल्स–शिवगंगा कॉम्प्लेक्स -न्यु युनीटी मेडिकेअर) शुभश्री हाऊसिंग सोसायटी, आकुर्डी (शुभश्री हौसिंग सोसायटी–जय गणेश हॉटेल–मदिना मशीद–सद्गुरु अपार्टमेंट–आकुर्डी मेन रोड–खंडोबा माळ चौक–आयनॉक्स रोड–जय गणेश व्हिजन–हॉटेल आंगण-शुभश्री हाऊसिंग सोसायटी)परिसर काल मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वीच चिंचवडमध्ये कोरोना संक्रमित असलेली एक व्यक्ति पुण्याहून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती आणि चिंचवड मध्ये खळबळ उडाली होती. तशीच घटना आज आकुर्डीत देखील घडली आहे. आकुर्डीतील जय गणेश  व्हीजन
परिसरात आपल्या नातेवाईकांना भेटायला  आलेल्या पाहुण्याला कोरोनाची लक्षणं असल्याचे समजून आल्यानंतर त्या व्यक्तीला  ससून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने आकुर्डी परिसरात एकच खळबळ उडाली.

या मुळे आजूबाजूच्या परिसरात दाट लोकवस्ती असलेल्या आकुर्डी गावठाण, पांढरकर वस्ती, पंचतारा नगर या परीसारतील लोकांमध्ये घबराटीचे  वातावरण आहे. जय गणेश व्हीजन परिसरात संचारबंदी करण्यात आल्याचे समजते परंतु प्रशासनाला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि संपूर्ण परिसरात लोकांच्या हालचालींवर पोलिसांनी  लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. तसेच पाहुण्यांमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे, तरी नागरिकांनी आपल्या  जिवाची काळजी घेत पाहुण्यांना आमंत्रण देऊ नये जेणेकरून कोरोना पासरण्याची शक्यता कमी होईल.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now