AdminMT - यांनी लिहिलेले | October 7, 2020

७ ऑक्टोबर २०२०,
युईत सध्या आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवला जातो आहे. सर्व भारतीय खेळाडू आणि काही आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद होते. यानंतर जून महिन्यापासून आयसीसीने नियमांमध्ये बदल करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला परवानगी दिली. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर कधी जाणार याची उत्सुकता सर्व चाहत्यांना होती.

आयपीएलचा तेरावा हंगाम आटोपल्यानंतर भारतीय संघ युएईवरुन थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ब्रॉडकास्टर्स यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. तरीही या दौऱ्याचं ढोबळमानाने वेळापत्रक तयार करण्यात आलं असून दोन्ही संघ या दौऱ्यात ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार २६ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

जाणून घेऊयात दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिली वन-डे – २६ नोव्हेंबर
दुसरी वन-डे – २८ नोव्हेंबर
तिसरी वन-डे – ३० नोव्हेंबर
===================================================

पहिली टी-२० – ४ डिसेंबर
दुसरी टी-२० – ६ डिसेंबर
तिसरी टी-२० – ८ डिसेंबर
(गुलाबी चेंडूवर भारतीय संघासाठी सराव सामना)

====================================================

पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर (बॉक्सिंग डे कसोटी)
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी

आमच्याशी संपर्क साधा
Call Now