१० ऑक्टोबर २०२०,
पुणे शहराच्या मध्य भागात शनिवारी दुपारी आकाश अचानक भरून आलं आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यासह 16 जिल्ह्यांना वेधशाळेने इशारा दिला आहे. घराबाहेर पडताना सावधान, कारण पुढचे तीन ते चार तास काही भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या 16 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने इशारा जारी केला आहे.

पुण्यात पावसाला सुरुवात झालीच आहे. याशिवाय ठाणे, मुंबईतही वातावरण ढगाळ आहे. पुढच्य 3 ते 4 तासांत रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्मम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याबरोबर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजा पडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.

VERO MODA Cotton a-line Dress

संपूर्ण राज्यभर आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाडा वाढणार आणि त्याबरोबरच दुपारनंतर धुवांधार वादळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज मान्सूनसारखा सर्वदूर वर्तवण्यात आलेला नाही. काही भागात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो तर थोड्याच अंतरावर पावसाचं प्रमाण कमी असू शकतो. यामुळे कमी वेळात अधिक पाऊस बरसण्याचा धोका आहे. त्याबरोबर विजांचाही धोका असल्याने हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच शनिवार आणि रविवारी मुंबई वगळता संपूर्ण कोकण परिसरात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.मराठवड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह आणि विजांसह पाऊस येऊ शकतो. त्यामुळे शेतात कामासाठी बाहेर पडताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत मराठवड्यात असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.

आमच्याशी संपर्क साधा
Call Now